토토사이트ankara escort bayan토토사이트토토사이트안전놀이터Harvest Superslim VanillaHarvest Sweet CoconutHarvest Sweet VanillaGeorge Karelias And Sons Refined VirginiaGeorge Karelias And Sons Selected VirginiaGeorge Karelias And Sons Smoother TasteGeorge Karelias And Sons Superior VirginiaKarelia Leader RedKarelia Ome SuperslimKarelia Ome Superslims RedKarelia Ome Superslims WhiteKarelia Ome Superslims YellowKarelia SlimsKent D Range BlueKent Mix AromaLucky Strike 4 Click MixLucky Strike RedMarlboro Double Fusion SummerMarlboro Edge Less Smell Slim토토사이트Ataşehir escort
ग्रामपंचायतींना जन सुविधा योजने अंतर्गत विशेष अनुदान | Panchayat Samiti Palghar | India

ग्रामपंचायतींना जन सुविधा योजने अंतर्गत विशेष अनुदान

योजनेचे स्वरुप माहिती

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय ददभू/2010/प्र.क्र.62/पंरा-6,दिनांक 16 सप्टेंबर 2010 व 31.10.2015 व 25 जानेवारी 2018

योजनेंतर्गत घ्यावयाची कामे:-

  • ग्रामीण भागात दहन/दफन भूमीची व्यवस्था करणे, त्या सुस्थितीत ठेवणे त्याचे नियमन करणे यासाठी स्मशान भूमीवर हाती घ्यावयाची कामे:-
  • दहन/दफन भूसंपादन
  • चबुतऱ्याचे बांधकाम
  • शेडचे बांधकाम
  • पोहोच रस्ता
  • गरजेनुसार कुंपण वा भिंती घालुन जागेची सुरक्षितता साधणे
  • दहन/दफन भूमीत विद्युतीकरण व आवश्यकतेनुसार विद्युतदाहीनी / सुधारित शवदाहीनी व्यवस्था
  • पाण्याची सोय
  • स्मशान घाट/नदीघाट बांधकाम (स्मशान व्यवस्थेसाठी आवश्यक तेवढे)
  • जमीन सपाटीकरण व तळफरशी
  • स्मृती उद्यान
  • ग्रामपंचायत भवन/कार्यालय याबाबत हाती घ्यावयाची कामे:-
  • नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम इमारती अंतर्गत सुविधा
  • जुन्या ग्रामपंचायत इमारतीची पुनर्बांधणी / विस्तार
  • ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये वृक्षारोपण, परिसर सुधारणा, परिसराला कुंपन घालणे इतर अनुषंगीक कामे
  • जन सुविधा योजनेतंर्गत कामांची व्याप्ती वाढविणे:-
  1. ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार केंद्र विकसीत करणे
  2. गावतलावातील गाळ काढून गावतलावांचे सुशोभिकरण करणे
  3. घनकचरा व्यवस्था करणे
  4. भूमीगत गटार बांधणे
  5. ग्रामपंचायत हद्दीमध्ये अस्तित्वात असलेल्या विहिंवर सौरऊर्जेवर आधारित दुहेरी हातपंप बसविणे तसेच जलशुध्दीकरण आर ओ प्लांटची व्यवस्था करणे

ड) जनसुविधा योजनेंतर्गत घेण्यात येणारे रस्ते

  1. गावांतर्गत रस्ते
  2. एका वस्ती / पाड्यांपासून दुसऱ्या वस्ती पाड्यापर्यंत जोडरस्ता बांधणे

योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता

१) या योजने अंतर्गत प्रत्येक कामास प्रशासकिय मान्यता ग्रामसभेच्या सहमती नंतर ग्रा.पं. मार्फत घेण्यात यावी.

२) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.

३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे

४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव

५) सदर योजने अंतर्गत कामांची निवड जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येईल.

६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा

७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र

८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा

९) गट विकास अधिकारी यांचे शिफारशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जिल्हा परिषद पालघर कडे सादर करण्यात यावा.

ग्रामपंचायतींना नागरी सुविधा योजने अंतर्गत विशेष अनुदान

 योजनेचे स्वरुप माहिती

महाराष्ट्र शासन व ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र व्हीपीएम-२६१०/प्र.क्र.१२९ / परा४ दि.२६ सप्टेंबर २०१० अन्वये मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत खालील अतिरिक्त सुविधा देणे आवश्यक आहे.

  • अंतर्गत बाजारपेठ विकास
  • सार्वजनिक दिबाबत्तीची सोय,
  • बागबगीचे, उद्याने तयार करणे,
  • अभ्यासकेंद्र,
  • गांवअंतर्गत रस्ते करणे
  • सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुमीगत नाल्याचे बांधकाम करणे.

 

योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता 

१) या योजने अंतर्गत ग्रा.प. ने आराखडा तयार करुन त्यास ग्रामसभेची प्रशासकिय मान्यता घ्यावी. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांची प्रस्तावास मान्यता घेण्यात यावी.

२) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी.

३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे

४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव

५) जिल्हयातील ग्रा.प.चा प्राधान्य क्रम ठरविण्याचा अधिकार जिल्हा नियोजन मंडळाकडे असेल ज्या ग्रा.प.ची लोकसंख्या ५००० च्या वर आहेत व ज्या ग्रामपंचायती पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेत सहभागी होऊन त्या योजनेच्या निकषाची पुर्तता केली असेल त्यामधुनच जिल्हा नियोजन मंडळ प्राधान्यक्रम ठरविल.

६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा

७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र

८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा

९) गट विकास अधिकारी यांचे शिफारशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जिल्हा परिषद पालघर कडे सादर करण्यात यावा.