योजने बद्दल माहिती :
जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करून जीवनमान उंचावणे व त्यांना स्वयंपूर्ण करणे.
लाभार्थी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे राहतील.
- लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.
- शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
III. शेतकऱ्याच्या नावे जमिन धारणेचा ७/१२ दाखला, ८-अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य राहील.
VII. सदर योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू असलेली रु.१,५०,०००/- वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर एवढी शेत जमीन असणे आवश्यक असेल. मात्र, लाभार्थ्यांची जमीन दुर्गम भागात व विखंडीत असल्याने ०.४० हेक्टर पेक्षा कमी जमीन धारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमीन किमान ०.४० हेक्टर इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. त्याचप्रमाणे दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल ६.० हेक्टर धारणक्षेत्राची अट लागू असणार नाही.
VIII. एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय होणार नाही.
- अशाच स्वरुपाच्या कृषी विषयक विकास योजनेकरता विशेष घटक योजनेतून तसेच केंद्र शासनाच्या SCA व घटनेच्या कलम २७५ (A) अंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ दिला असल्यास या योजनेंतर्गत देण्यात येणारा लाभ अनुज्ञेय असणार नाही.
- सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर त्याबाबतची नोंद घेण्यात येईल.
Benefits:
| अ. क्र. | विषय | अनुदान मर्यादा (रु.) |
| १ | नवीन सिंचन विहीर | ४,००,००० |
| २ | जुनी विहीर दुरुस्ती | १,००,००० |
| ३ | शेततळे प्लॅस्टिक अस्तरीकरण | प्रचलित आर्थिक निकष व शेततळ्याच्या आकाराप्रमाणे गणना केलेल्या रकमेपैकी 90% किंवा प्रत्यक्ष खर्च किंवा २,००,०००/- यांपैकी जे कमी असेल ते |
| ४ | विहिरीत बोरींग | ४०,००० |
| ५ | वीज जोडणी | २०,००० किंवा प्रत्यक्ष भरलेला खर्च यांपैकी जे कमी असेल ते |
| ६ | इलेक्ट्रिक पंप संच / डिझेल इंजिन (नवीन बाब) | १० HP क्षमतेपर्यंत पंप संच → प्रचलित आर्थिक निकषांपैकी 90% किंवा प्रत्यक्ष खर्च किंवा ४०,०००/- यांपैकी जे कमी असेल ते |
| ७ | सौर पंप (वीज जोडणीच्या ऐवजी) | प्रचलित आर्थिक निकषांपैकी 90% किंवा प्रत्यक्ष खर्च किंवा ५०,०००/- यांपैकी जे कमी असेल ते |
| ८ | एचडीपीई / पीव्हीसी पाईप (नवीन बाब) | प्रचलित आर्थिक निकषांनुसार 100% किंवा प्रत्यक्ष खर्च किंवा ५०,०००/- यांपैकी जे कमी असेल ते |
| ९ | मायक्रो सिंचन प्रणाली | |
| ९.१ | स्प्रिंकलर सिंचन प्रणाली | प्रचलित आर्थिक निकषांपैकी 90% किंवा प्रत्यक्ष खर्च किंवा ४७,०००/- यांपैकी जे कमी असेल ते |
| ९.२ | ड्रिप सिंचन संच | प्रचलित आर्थिक निकषांपैकी 90% किंवा प्रत्यक्ष खर्च किंवा ९७,०००/- यांपैकी जे कमी असेल ते |
| ९.३ | स्प्रिंकलर सिंचन संच – पूरक अनुदान | Per Drop More Crop योजनेतर्गत (१) लहान/सीमांत शेतकरी → 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 25% + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 10% (२) इतर शेतकरी → 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 30% + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 15% एकूण 90% अनुदान मर्यादा, कमाल ₹47,000 |
| ९.४ | ड्रिप सिंचन संच – पूरक अनुदान | Per Drop More Crop योजनेतर्गत (१) लहान/अतिलहान शेतकरी → 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 25% + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 10% (२) मोठे शेतकरी → 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 30% + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 15% एकूण 90% अनुदान मर्यादा, कमाल ₹97,000 |
| १० | यांत्रिक अवजारे (बैलगाडी / ट्रॅक्टर चालित) (नवीन बाब) | ५०,००० |
| ११ | बॅकयार्ड गार्डन (नवीन बाब) | ५,००० |
| १२ | विंधन विहीर (नवीन बाब) | ५०,००० किंवा प्रत्यक्ष खर्च यांपैकी जे कमी असेल ते |
अर्ज कसा करावा-
योजनेचा लाभ घेण्याचं दृष्टीने महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेत स्थळ आहे. या संकेत स्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा, सादर योजनेबाबत अधिक माहिती जाणुन घेणेसाठी आपल्या संबंधित पंचायत समितीतील कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.