महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्रमांक :जजमि२०१९/प्र.क.१३८/पापु-१०(०७) दि. ०४ सप्टेंबर, २०२० या शासन निर्णयानुसार सन २००९ -१० पासून केंद्र शासन पुरस्कृत सुरु असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करुन, पुनर्रचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत “हर घर नल से जल” (FHTC-Functional Household Tap Connection) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द आहे. सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या अंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुध्द व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करुन देणे हे उद्दिष्ट आहे. यात फक्त योजना पुर्ण करणे एवढाच उद्देश नसुन कार्यक्षम पाणी पुरवठयाची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधील प्रमुख गाभा आहे. केद्र शासनाच्या कार्यरत मार्गदर्शक सुचनांनुसार जल जीवन मिशनची राज्यात अंमलबजावणी करणेआणि मिशन अधिकाधिक परिणामकारक करणे.