मुख्याधिकारी
कोणताही डेटा आढळला नाही.
कोणताही डेटा आढळला नाही.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा 1 अंतर्गत सर्व समाजातील कुटुंबांना योग्य राहणीमान उपलब्ध व्हावे ह्या हेतूने केंद्र शासनाअंतर्गत योजना सन 2016-17 ते 2021-22 पर्यंत राबविली जाते होती.
सदर योजनेअंतर्गत पालघर तालुक्यातील एकूण 133 ग्रामपंचायत अंतर्गत 3185 लाभार्थी पात्र झाले आहेत. त्याअनुषंगाने सदर लाभार्थींना 4 हप्ते अदा करण्यात येतात.
प्रतिघरकुल रक्कम | MREGS रक्कम | SBM रक्कम | एकूण रक्कम |
---|---|---|---|
1,20,000/- | 24,570/- | 12,000/- | 1,56,570/- |
सदर योजनेअंतर्गत वरील तक्त्यानुसार प्रति घरकुल रक्कम रु. 1,56,570/- अदा करण्यात येतात.
या एकूण 3185 लाभार्थींपैकी 3183 लाभार्थींना पहिला हप्ता अंतर्गत रक्कम रु. 15,000/- दिलेले आहेत. त्यापैकी 2 लाभार्थींना पहिला हप्ता मिळाला नाही कारण 1 लाभार्थीचे पैसे खात्यात पडले नाहीत व 1 लाभार्थी ने पैसे परत केले आहेत. तसेच 3165 लाभार्थींना दुसरा हप्ता अंतर्गत रक्कम देण्यात आले आहेत. तसेच 3152 लाभार्थींना तिसरा हप्ता दिले आहेत व 3126 लाभार्थींना चौथा हप्ता दिले आहेत. तसेच एकूण 3140 लाभार्थींचे घरकुल पुर्ण स्थितीत झाले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा – 2 अंतर्गत सर्व समाजातील कुटुंबांना योग्य राहणीमान उपलब्ध व्हावे ह्या हेतूने केंद्र शासनाअंतर्गत योजना 2024-25 राबविली जात आहे.
सदर योजनेअंतर्गत पालघर तालुक्यातील एकूण 121 ग्रामपंचायत अंतर्गत 5988 लाभार्थी पात्र झाले आहेत. त्याअनुषंगाने सदर लाभार्थींना 4 हप्ते अदा करण्यात येतात.
प्रतिघरकुल रक्कम | MREGS रक्कम | SBM रक्कम | एकूण रक्कम |
---|---|---|---|
1,20,000/- | 24,570/- | 12,000/- | 1,56,570/- |
सदर योजनेअंतर्गत वरील तक्त्यानुसार प्रति घरकुल रक्कम रु. 1,56,570/- अदा करण्यात येतात.
या एकूण 5988 लाभार्थींपैकी 5282 लाभार्थींना पहिला हप्ता अंतर्गत रक्कम रु. 15,000/- दिलेले आहेत. तसेच 4031 लाभार्थींना दुसरा हप्ता अंतर्गत रक्कम रु. 70,000/- देण्यात आले आहेत. तसेच 3111 लाभार्थींना तिसरा हप्ता अंतर्गत रक्कम रु. 30,000/- दिले आहेत व 39 लाभार्थींना चौथा हप्ता अंतर्गत रक्कम रु. 5,000/- दिले आहेत. तसेच एकूण 627 लाभार्थींचे घरकुल पुर्ण स्थितीत झाले आहेत.
शबरी आवास योजना सन 2016-17 ते 2023-24 अंतर्गत अनुसुचीत जमाती समाजातील कुटुंबांना योग्य राहणीमान उपलब्ध व्हावे ह्या हेतूने राज्य शासनाअंतर्गत योजना राबविली जाते.
सदर योजनेअंतर्गत पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत 1742 लाभार्थी पात्र झाले आहेत. त्याअनुषंगाने सदर लाभार्थींना 4 हप्ते अदा करण्यात येतात.
प्रतिघरकुल रक्कम | MREGS रक्कम | SBM रक्कम | एकूण रक्कम (प्रति घरकुल) |
---|---|---|---|
1,20,000/- | 24,570/- | 12,000/- | 1,56,570/- |
सदर योजनेअंतर्गत वरील तक्त्यानुसार प्रति घरकुल रक्कम रु. 1,56,570/- अदा करण्यात येतात.
या एकूण 1742 लाभार्थींपैकी 1737 लाभार्थींना पहिला हप्ता अंतर्गत रक्कम रु. 15,000/- दिलेले आहेत. तसेच 1728 लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात आले व 1712 लाभार्थींना तिसरा हप्ता दिले आहेत. तसेच एकूण 1655 लाभार्थींचे घरकुल पुर्ण स्थितीत झाले आहेत.
रमाई आवास योजना सन 2016-17 ते 2024-25 अंतर्गत अनुसुचीत जाती समाजातील कुटुंबांना योग्य राहणीमान उपलब्ध व्हावे ह्या हेतूने केंद्र शासनाअंतर्गत योजना राबविली जाते.
सदर योजनेअंतर्गत पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत 205 लाभार्थी पात्र झाले आहेत. त्याअनुषंगाने सदर लाभार्थींना 4 हप्ते अदा करण्यात येतात.
प्रतिघरकुल रक्कम | MREGS रक्कम | SBM रक्कम | एकूण रक्कम (प्रति घरकुल) |
---|---|---|---|
1,20,000/- | 24,570/- | 12,000/- | 1,56,570/- |
या एकूण 205 लाभार्थींपैकी 205 लाभार्थींना पहिला हप्ता दिलेले आहेत. तसेच 183 लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात आले व 171 लाभार्थींना तिसरा हप्ता दिले आहे व 167 लाभार्थींना चौथा हप्ता दिला आहे. तसेच एकूण 167 लाभार्थींचे घरकुल पुर्ण स्थितीत झाले आहेत.
मोदी आवास योजना सन 2023-24 अंतर्गत इ. मा. व. समाजातील कुटुंबांना योग्य राहणीमान उपलब्ध व्हावे ह्या हेतूने राज्यशासना अंतर्गत योजना राबविली जाते.
सदर योजनेअंतर्गत पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत 134 लाभार्थी पात्र झाले आहेत. त्याअनुषंगाने सदर लाभार्थींना 4 हप्ते अदा करण्यात येतात.
प्रतिघरकुल रक्कम | MREGS रक्कम | SBM रक्कम | एकूण रक्कम (प्रति घरकुल) |
---|---|---|---|
1,20,000/- | 24,570/- | 12,000/- | 1,56,570/- |
या एकूण 134 लाभार्थींपैकी 134 लाभार्थींना पहिला हप्ता दिलेले आहेत. तसेच 125 लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात आले व 119 लाभार्थींना तिसरा हप्ता दिले आहेत. तसेच 93 लाभार्थींना चौथा हप्ता देण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN) अंतर्गत कातकरी समाजातील कुटुंबांना योग्य राहणीमान उपलब्ध व्हावे ह्या हेतूने केंद्र शासनाअंतर्गत योजना राबविली जाते.
सदर योजनेअंतर्गत पालघर तालुक्यातील एकूण 40 ग्रामपंचायत अंतर्गत 1298 लाभार्थींचा सर्व्हे करण्यात आलेला आहे. तसेच त्यापैकी 1029 लाभार्थी पात्र झाले आहेत. त्याअनुषंगाने सदर लाभार्थींना 3 हप्ते अदा करण्यात येतात.
प्रतिघरकुल रक्कम | MREGS रक्कम | SBM रक्कम | एकूण रक्कम (प्रति घरकुल) |
---|---|---|---|
2,00,000/- | 24,570/- | 12,000/- | 2,36,570/- |
या एकूण 1029 लाभार्थींपैकी 930 लाभार्थींना पहिला हप्ता अंतर्गत रक्कम रु. 90,000/- दिलेले आहेत. तसेच 451 लाभार्थींना दुसरा हप्ता अंतर्गत रक्कम रु. 90,000/- देण्यात आले व 78 लाभार्थींना तिसरा हप्ता अंतर्गत रक्कम रु. 20,000/- दिले आहेत. तसेच एकूण 127 लाभार्थींचे घरकुल पुर्ण स्थितीत झाले आहेत.