2 दुधाळ गट वाटप, 10+1 शेळी गट वाटप , 1000 मांसल कुक्कुट व्यवसाय , खाजगी भागीदारी तत्वावर कुक्कुट पालन, SMART योजना, मुख्यमंत्री पशुस्वस्थ्य योजना,
Animal Husbandry Department
2 दुधाळ गाई/म्हशी गट वाटप, 10+1 शेळी गट वाटप
या योजनेंअंतर्गत अनुसूचित जमाती लाभार्थीना स्वयंरोजगाराद्वारे उत्पनाचे साधन उपलब्ध करून देणे . या योजने अंतर्गत खालील योजनांचा सामावेश आहे .
वैरण उत्पाद्नासाठी शेतकऱ्यांना उत्साहित करण्यासाठी या योजनेंअंतर्गत 100% अनुदानावर प्रती लाभार्थी रु.4000 वैरण बियाणे/ठोंब/चे वैरण
वाटप करण्यात येतात.सर्व प्रवर्गातील पशुपालक या योजनेचा लाभ घेवू शकतात.
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एक दिवसीय १०० पिल्ले वाटप–
जिल्हातील कुक्कुट पालनाचा विकास होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गt सर्व संवर्गातील गरीब होतकरू पशुपालक यांना 50% अनुदानावर 1 दिवसीय 100 पिल्लांचे गट
याचबरोबर खाद्य वाटप करणे.
जिल्हातील अपंग पशुपालकांना स्वयंरोजगाराची आवड निर्माण करणे दुधउत्पादनातून आर्थिक वाढ करण्यासाठी या योजने अंतर्गत शासनाने विहित केल्यानुसार एका गाईची रक्कम रु. ७००००/- व एका म्हैसीची रक्कम रु. ८००००/- आहे. या योजनेअंतर्गत ९०% जि.प. अनुदान रु १,२६,००० दोन गाईसाठी व रु १,४४,०००/- दोन म्हैस साठी निर्धारित आहे. गाईच्या/ म्हैशीच्या विमा व वाहतूक खर्च लाभार्थीने स्वता करावयाचा आहे.
जिल्हातील अपंग पशुपालकांना स्वयंरोजगाराची आवड निर्माण करणे व पशुपालकाचे उत्पन्न वाढवणे. शेळीगट (10+1 ) शासनाने विहित केलेले रक्कम रु.६८,000/- आहे. जिल्हा परिषद ९०% अनुदान रु. ६१२००/- निर्धारित आहे. शेळीगट (10+1 ) चा विमा व वाहतूक खर्च लाभार्थीने स्वता करावयाचा आहे.
आपत्कालीन परिस्थितीत दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य करणे
नैसर्गिक व आपात्कालीन परिस्थितीमध्ये उदा. पूर /अतिवृष्टी/ वीज कोसळून /डोंगरदरीत पडून जनावर मृत / वाडा कोसळून अथवा जळून जनावर सर्पदंश / विष बाधेने / रेबीज आजार / गंभीर आजाराने अचानक मरण पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना तात्काळ अर्थसहाय्य करणे हा योजनेचा उद्देश आहे.