कृषि विभाग

विभागप्रमुख

No data found

 जि.प सेस अंतर्गत योजना

अ.क्र. योजनेचे नाव योजनेअंतर्गत खरेदी करावयाचे साहित्य
कीड रोगांचे नियंत्रण कीड रोग नियंत्रणासाठी रासायनिक व जैविक कीटकनाशके बुरशीनाशकांची व तन नाशके इत्यादी खरेदी करता अनुदान देणे.
शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे साहित्य व इतर बाबी पुरवठा विविध पीक संरक्षण अवजारे करिता अनुदान देणे.
शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य व सुधारित कृषी अवजारे कृषी प्रक्रिया उद्योगांकरिता साहित्य पुरवठा हस्तंचलित व स्वयंचलित सुधारित कृषी अवजारांवर (उदा. मळणी यंत्र, ताडपत्री- दोन, गवत कापणी यंत्र, पावर विडर, चाफकटर, काजू प्रक्रिया यंत्र, दातेरी विळे- 25 नग, नारळ झावळ्या कापणी यंत्र, भात कापणी यंत्र, एचडीपीई, पीव्हीसी पाईप 400 फूट, शेडनेट, मल्चिंग पेपर, शेतीमाल वाळविन्याकरिता यंत्र, अर्थ अगर, आंबा झेला, तेल काढणी यंत्र तसेच इतर मान्यताप्राप्त शेती उपयोगी सुधारित अवजारे व यंत्रसामग्री यांच्यासाठी 50 टक्के अनुदान देणे येईल.
शेतीसाठी सिंचन साहित्य पुरवठा करणे डिझेल, पेट्रोडिझेल, विद्युत इ. जल उपसा सिंचन साधने तसेच सौर पंप करिता 50 टक्के अनुदान देण्यात येईल.
शेतकऱ्यांना मोगरा लागवडीसाठी/ फुल शेतीसाठी/ रेशीम उद्योगासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना
  1. मोगरा लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्यास दहा आर क्षेत्राच्या मर्यादित खर्चाच्या 75 टक्के पर्यंत महत्त्व रुपये पण साडेबारा हजार इतके अनुदान देय राहील.
  2. सोनचाफा लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्यास दहा आर क्षेत्राच्या मर्यादित खर्चाच्या 75 टक्के पर्यंत महत्तम रुपये 21500 इतके अनुदान देय राहील.
  3. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत रेशीम उद्योग या घटकासाठी मंजूर मापदंडानुसार सर्व घटकांकरिता एकूण 50 टक्के महत्तम रुपये एक लाख पर्यंत अनुदान देण्यात येईल.
आधुनिक शेतीस प्रोत्साहन देणे व नावीन्यपूर्ण योजना राबविणे
  1. फळपीक काढणीकरिता लाकडी शिडी बनवण्याकरता आर्थिक करणे.
  2. लाकडी मांडव तयार करण्यासाठी कमीत कमी दहा गुंठे क्षेत्रासाठी रुपये 5000 किंवा प्रत्यक्ष खरेदी किंमतीच्या 75 टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदेय राहील व जास्तीत जास्त एकर क्षेत्राकरिता वीस हजार किंवा प्रत्यक्ष खरेदी किंमतीच्या 75 टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदेय राहील अनुदान देण्यात येईल.
  3. मशरूम लागवडीकरता प्रति शेतकारी 100 बेड व क्षेत्र 20 फूट * 20 फूट तयार करण्याकरता 15000 रुपये किंवा प्रत्यक्ष प्रतिकृतीच्या 75 टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदेय राहील.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी नवीन विहीर खोदकाम व बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती व शेततळे अस्तरीकरण करणे लाभार्थ्यास नवीन विहीर रक्कम रुपये २५०००० जुनी विहीर दुरुस्ती रक्कम रुपये ५०००० अनुदान तसेच शेततळे अस्तरीकरण करिता १००००० रुपये देणे.
कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करता प्रोत्साहन देणे पावर टिलर, मिनी ट्रॅक्टर, पावर विडर, भात लावणी यंत्र, मिनी राईस मिल.
कृषी प्रक्रिया संयंत्र खरेदी करता अर्थसाह्य (सोलार ड्रायर) शेतीमाल वाळविण्याकरता सोलर ड्रायर व कटर मशीन खरेदी करतात 80 टक्के अनुदान देण्यात येइल.
१० महिला किसान शक्ती पंख योजना (ड्रोन खरेदी करता अर्थसाह्य ) महिला स्वयंसहाय्यता गटांना, ग्रामसंघ किंवा शेतकरी उत्पादक कंपनी शेतीसाठी भाड्याने सेवा प्रदान करण्यासाठी द्रोन खरेदी करता 80 टक्के अनुदान देणे.
११ शेतीत बांबू लागवड करणे  बांबू लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्यास कमीत कमी दहा आर क्षेत्राच्या मर्यादित खर्चाच्या 90% पर्यंत महत्तम रुपये २७२०० इतके अनुदान देय राहील तसेच जास्तीत जास्त एक एकर क्षेत्राच्या मर्यादित खर्चाच्या 90% पर्यंत महत्तम रुपये १०८९०० इतके अनुदान देय राहील.
१२ दिव्यांग शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानाने शेतीसाठी साहित्य पुरवठा सदर योजनेअंतर्गत दिव्यांग शेतकऱ्यांना पंपसंच ३/५ एचपी, मळणी यंत्र, ताडपत्री, गवत कापणी यंत्र, पावर विडर, चाफ कटर, दातेरी विळे, भात लावणी यंत्र, भात कापणी यंत्र, पीव्हीसी पाईप इत्यादी बाबींचा 90% अनुदानाने जास्तीत जास्त एक लाख चे मर्यादित लाभ देता येईल.

जिल्हा परिषद सेस निधी सन 2025-26 अंतर्गत 50%

विनंती अर्ज

प्रति,

    मा. गटविकास अधिकारी

    पंचायत समिती ———–

विषय :- जिल्हा परिषद सेस निधी सन 2025-26 अंतर्गत 50% अनुदानाने———————————— या योजनेतून ………………………………………….खरेदी करीता अनुदान मिळणेकरीता अर्ज……. महोदय,

                    उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सन 2025-26 अंतर्गत शेतकऱ्यांना पीक संरक्षण अवजारे, सुधारीत अवजारे, पंपसंच,         

          आधुनिक/ नाविन्यपुर्ण साहित्य व इतर बाबी करीता अनुदान मिळणेबाबत अर्ज खालील माहितीसह सादर करीत आहे.

1 लाभाथ्याचे संपूर्ण नांव
2 संपूर्ण पत्ता
3 संपर्क क्र.
4 7/12 वा खाते उता-यानुसार सर्वे नं-
5 खरेदी करावयाचे  साहित्य  व साहित्यांची  वैशिष्टे (Specification)
6 लाभाथ्याचा आधार कार्ड क्रमांक
7 लाभाथ्याच्या बँकेचे नांव व शाखेचे नाव
8 लाभाथ्याचे बँक खाते क्रमांक
9 IFS Code

प्रमाणित करतो की, पंचायत समिती मधील वैयक्तिक लाभाच्या योजनेतून वस्तु/साहित्य शासनाने विहित केलेल्या  कार्यपध्दतीनुसार खरेदी करेन व सदर खरेदीच्या पावत्या आपल्या कार्यालयास  त्वरेने सादर करेन. तरी वरीलप्रमाणे साहित्य खरेदीस मंजुरी मिळावी व शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार अनुदान रक्कम माझ्या खात्यावर वर्ग करण्यात यावी ही विनंती.

                                                                                                         अर्जदाराची सही/ अंगठयाचा ठसा

सोबत- 7/12 चा उतारा

व बँक खात्याची झेरॉक्स प्रत,

खरेदी करावयाच्या साहित्याचे दरपत्रक.

शिफारस पत्र

मी श्री./श्रीम.————————————————- कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी कृषि पंचायत समिती———जि.पालघर शिफारसपत्र सादर करतो की, श्री./श्रीम. ————————————————–मु.———————-पो. ——————ता.————जिल्हा पालघर हा शेतकरी ————-तालुक्यात रहात आहे. या शेतक-याकडून वा त्याचे कुटुंबियाकडून  ————– हे. क्षेत्रावर ————— पिकाची लागवड करणेत आली आहे. तरी वरील शेतकऱ्याने जिल्हा परिषद सेस फंड सन 2025-26 मधील ————————————————-या योजनेतून 50% अनुदानाने ———————–साहित्य खरेदी करावयाचे असलेबाबत विनंती अर्ज सादर केलेला आहे. अर्जासोबत 7/12 चा उतारा, बँक खात्याची झेरॉक्स प्रत व खरेदी करावयाच्या साहित्याचे दरपत्रक जोडले आहे. तरी सदरचे साहित्य खरेदीकरीता मंजुरी मिळण्यास  शिफारस करीत आहे.

                                                                                          कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी कृषि                                      

                                                                                            पंचायत समिती———–              

अनुदान मिळणेकरीता अर्ज

      प्रति,

           मा. गटविकास अधिकारी

           पंचायत समिती ———–

          विषय :- जिल्हा परिषद सेस निधी सन 2025-26 अंतर्गत 50% अनुदानाने—————————————————— या योजनेतून खरेदी केलेल्या कृषि साहित्याची अनुदान रक्कम मिळणेबाबत…..

       महोदय,

           उपरोक्त संदर्भिय विषयान्वये मी —————————————-मु.——————–पो.—————ता. ————- सन 2025-26 या वर्षाकरिता कृषि विभागाकडील————————————————————— सेस फ़ंडातील योजनेतून खालीलप्रमाणे वस्तु/ साहित्य खरेदी केलेले आहे. तरी त्याकरीता जिल्हा खरेदी समितीने निर्धारीत केलेल्या दरानुसार देय अनुदान माझ्या बँक खात्यात जमा होणेस विनंती आहे.                                                   

1 खरेदी केलेल्या साहित्याचे नाव व वैशिष्टे (Specification)
2 लाभाथ्याच्या बँकेचे नांव व शाखेचे नाव
3 लाभाथ्याचे बँक खाते क्रमांक (IFS Code सह)
4 लाभाथ्याचा आधार कार्ड क्रमांक-

                                                                                                      अर्जदाराची सही/ अंगठयाचा ठसा

स्थळ  पहाणी  प्रमाणपत्र

           प्रमाणित करणेत येते की, ———————————————

मु.——————–पो.—————— ता. ————जिल्हा पालघर हा शेतकरी ————-तालुक्यात रहात आहे. या शेतक-याकडून वा त्याचे कुटुंबियाकडून  ————– हे. क्षेत्रावर ————— पिकाची लागवड करणेत आली आहे. तरी वरील शेतकऱ्याने जिल्हा परिषद सेस फंड सन 2025-26 मधील ————————————————-या योजनेतून 50% अनुदानाने ——————————————— खरेदी केलेले आहे. संबंधीत लाभार्थ्याने सदर साहित्य खरेदीच्या पावत्या व अनुदान मिळणेबाबतचा अर्ज या कार्यालयास सादर केलेला आहे. सदरच्या साहित्याची खरेदी किंमत ————असुन र. रु. ————इतके अनुदान देय आहे. तरी सदर साहित्याकरीता शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार देय अनुदान रक्कम रु.———–लाभाथ्याच्या बँक खात्यात जमा करणेस हरकत नाही.

बँक खाते तपशील

बँकेचे नाव- 

IFS Code- 

खाते क्र.-

मो. क्र.

दिनांक :       /    /                                                                       पहाणी अधिका-याची सही

स्थळ                                                                                         नाव :-

                                                                                                हुद्या :-

गटविकास अधिकारी

पंचायत समिती —————     

जि. प. सेस योजनेंतर्गत आवश्यक कागदपत्रे

* सातबारा व आठ अ उतारा (डिजिटल किंवा तलाठी यांचे स्वाक्षरी असलेला)

* आधार कार्ड

* बँकेचे पासबुक

* उत्पन्न दाखला ( नवीन विहीर,  जु, विहीर दुरुस्ती,  तार कंपाऊंड करिता)

     (१.५० लाखापर्यंत असणे आवश्यक)

योजनेचे नाव :- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

           बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुसूचित जमाती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण इत्यादी घटकांसाठी पॅकेज स्वरूपात खालील प्रमाणे अनुदान देण्यात येते महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्जापासून ते निधी वितरणापर्यंत संपूर्ण कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने केली जाते.

घटक उच्चतम देय अनुदान
नवीन सिंचन विहीर ४,००,०००/-
जुनी विहीर दुरुस्ती १,००,०००/-
शेततळ्याचे अस्तरीकरण २,००,०००/-
इनवेल बोरिंग ४०,०००/-
विंधन विहीर (वनपट्टा लाभार्थी) ५०,०००/-
पंपसंच ४०,०००/-
सोलर पंप ५०,०००/-
ठिबक सिंचन संच ९७,०००/-
तुषार सिंचन संच ४७,०००/-
परस बाग ५,०००/-
यंत्र सामग्री ५०,०००/-

योजनेस पात्र लाभार्थी

* लाभार्थी अनुसूचित जमाती / अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.

*  स्वतःच्या नावाने किमान 0.40 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर हे शेतजमीन असणे आवश्यक.

*  महिला दिव्यांग लाभार्थीस प्राधान्य तसेच राखीव निधी दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य

*  यापूर्वी केंद्र किंवा राज्य निधीतून नवीन सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा

 आवश्यक कागदपत्रे

* फार्मर ID

* आधार कार्ड

* सातबारा व आठ अ उतारा (डिजिटल किंवा तलाठी यांचे स्वाक्षरी असलेला)

* वैध जात प्रमाणपत्र .

*  राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक

*  ग्रामसभा ठराव

अर्ज कसा करावा 

* www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज नजीकच्या सीएससी सेंटर मधून किंवा आधार सेवा केंद्रात करता येईल

* अर्ज सद्यस्थितीच्या माहितीसाठी महाडीबीटी फॉर्म चा वापर करावा