토토사이트ankara escort bayan토토사이트토토사이트안전놀이터Harvest Superslim VanillaHarvest Sweet CoconutHarvest Sweet VanillaGeorge Karelias And Sons Refined VirginiaGeorge Karelias And Sons Selected VirginiaGeorge Karelias And Sons Smoother TasteGeorge Karelias And Sons Superior VirginiaKarelia Leader RedKarelia Ome SuperslimKarelia Ome Superslims RedKarelia Ome Superslims WhiteKarelia Ome Superslims YellowKarelia SlimsKent D Range BlueKent Mix AromaLucky Strike 4 Click MixLucky Strike RedMarlboro Double Fusion SummerMarlboro Edge Less Smell Slim토토사이트Ataşehir escort
प्रस्तावना :- | Panchayat Samiti Palghar | India

प्रस्तावना :-

पालघर तालुक्याचा पश्चिमेकडील भाग अरबी समुद्र किनारपट्टीचा असून पूर्वे कडील भाग जंगलपट्टीचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १०२६ चौ.की.मी एवढे आहे. त्याच प्रमाणे तालुक्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणने नुसार ५,५०,७७७ इतकी आहे. तसेच पालघर तालुक्याला एकूण ११२ कि.मी एवढ्या लांबीचा समुद्र किनारा आहे. तसेच बंदरपट्टी ही लाभलेली आहे. पालघर तालुक्यातून राज्य महामार्ग क्रमांक ३४ व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हे महामार्ग जातात. रस्ते व रेल्वेची उत्तम सोय असल्यामुळे पालघर तालुका हा इतर तालुक्यांशी जोडलेला आहे. पालघर तालुक्यातील तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत असून त्या ठिकाणी अणुऊर्जेव्दारे वीज निर्मिती केली जाते. तसेच सादर ठिकाणी अणु संशोधन केंद्र आहे. तारापुर येथे अणूऊर्जा प्रकल्प टप्पा क्रमांक १,२,३,व ४ कार्यरत असून त्यामध्ये एकूण १४०० मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते.

सांस्कृतिक वारसा :-

पालघर तालुक्यामध्ये प्रामुख्याने वारळी, कातकरी, मल्हार कोळी, इत्यादी आदिवासी जमाती आहेत. आदिवासी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा जपलेला असून त्यामधील वारली चित्रकला व तारपा नृत्य ही त्यांच्या समाज जीवनाची ओळख आहे. वारली चित्रकला आदिम काळापासून जेव्हा मनुष्य गुहेत वास्तव्य करीत होता त्या काळापासून म्हणजे साधारणपणे ११०० वर्षांपासून जतन केलेली आहे. या चित्रकलेमध्ये आदिवासी समजाच्या विविध चालीरीती तसेच दैनंदिन जीवनात प्रसंग उदा. लग्न, नृत्य, विविध सण, निसर्गातील घडामोडी अशा प्रकारचे प्रसंग उत्तम प्रकारे चित्ररूपाने दाखविले जातात. ही चित्रे कुठल्याही प्रकारचा रसायनिक रंग न वापरता निसर्गापासून मिळणार्‍या वस्तु उदा. माती तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग व बांबूच्या कडयांचे ब्रश वापरुन काढली जातात. ही कला आदिवासींच्या जीवनशैलीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी चित्रकला असून या चित्रकलेला भारतात तसेच परदेशात खूप मागाणी आहे.

ऐतिहासिक पार्श्वभुमी :-

तालुक्याला सोनेरी इतिहासाचा वारसा आहे. भारतीय स्वातंत्य लढयामध्ये ‘सन १९४२ चे चले जाओ’ आंदोलनामध्ये पालघर हे महत्वाचे केंद्र आहे. इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता. या उठावामध्ये सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकुर, पालघरचे रामचंद्र भिमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, शिरगावचे सुकुर गोविंद मोरे हे पालघर तालुक्यातील पाच हुतात्मे स्वातंत्र्यासाठी लढा देताना शहीद झाले. या शहीदांचे स्मृती म्हणून पालघर तालुक्यामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे. तसेच सन १९३० चा गांधीजींच मिठाचा सत्याग्रह सुरू झाला तेव्हा पालघर तालुक्यातील वडराई ते सातपाटी पासून अनेक कार्यकर्ते या सत्याग्रहात सामील झाले होते. सातपाटी येथे परदेशी वस्तूंची होळी करण्यात आली होती.

पंचायतराज प्रशासन :-

पालघर तालुक्यामध्ये एकूण १३३ ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये महसुली उपविभागानुसार एकूण गावे २१५ वाडया/पाडे ९६८, मंडळ ०६, सजे ४१ इत्यादी अस्तित्वात आहेत.

नगरपालिका प्रशासन :-

पालघर तालुक्यात नगरपालिका अस्तित्वात असून नगरपरिषदेमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ६८,९३० इतकी आहे.

व्यवसाय :-

पालघर तालुक्यातील बंदरपट्टी भागामध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच त्यवार आधारित मासे सुकवणे, कोळंबी सवर्धन प्रकल्प इत्यादी व्यवसाय केले जातात. तालुक्यातील सातपाटी, दातिवरे, मुरबे, नवापुर, दांडी, आलेवाडी, नांदगाव इत्यादी ठिकाणी मासेमारीसाठी प्रमुख बंदरे आहेत. त्याचप्रमाणे मासे टिकवण्यासाठी शीतगृहे तसेच आईस फॅक्टरी या व्यवसायात देखील रोजगार निर्मिती होते. पालघर तालुक्यातील सातपाटी येथून पापलेट व कोळंबी या माशांची निर्यात केली जाते. बोईसर येथे महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाने १०२८ हेक्टर जागेची औदयोगिक क्षेत्र विकसित केले आहे. यामध्ये लहान-मोठे सुमारे १२००उदयोग कार्यरत आहेत. यामध्ये मुख्यत: टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, यासारख्या पोलाद निर्मिती करणारे कारखाने आहेत. तसेच डि-डेकॉर, सियाराम यासारखे कापड निर्मिती करणारे कारखाने आहेत. तसेच येथून मालाची निर्यात होऊन मोठया प्रमाणात परकीय चलन मिळते.

तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे :-

पालघर मधील प्रसिद्धा पर्यटन स्थळ असलेले मुंबई पासून अत्यंत जवळचे व निसर्गाची किमया असलेले केळवा बीच. येथे पर्यटकांची नेहमी रेलचेल आहे. पालघर तालुक्यातील केळवा येथील शितलादेवी व एडवण येथील आशापुरा देवी तसेच मनोर नांदगाव येथील महगणपती मंदीर हे जागरूक तीर्थक्षेत्र आहे.

दृष्टिक्षेपात पालघर तालुका :-

पालघर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार पालघर तालुक्याची एकूण लोकसंख्या ५५०१६६ इतकी आहे. ३२४७८६ ग्रामीण तर २२५३८० शहरी भागात राहते. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १०२६ चौ. किमी इतके असून ११२ किमी एवढया लांबीचा समुद्र किनारा व बंदरपट्टी लाभलेली आहे. पालघर तालुक्यातून राज्य महामार्ग क्र. ३४ राजकीय महामार्ग क्र. ८ हे महामार्ग जातात. रास्ते व रेल्वेची उत्तम सोय असल्यामुळे पालघर तालुका इतर तालुक्यांशी प्रामुख्याने मुंबई शहाराशी जोडलेला आहे.

भारतातील पहिले अणूशक्ती केंद्र तारापुर हे पालघर तालुक्यातच आहे. तारापुर येथे अणूऊर्जा प्रकल्प टप्पा क्र. १,२,३,४ कार्यरत असून त्यामध्ये एकूण १४०० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होते. तसेच बोईसार हे औदयोगिक शहर पालघर तालुक्याचाच एक भाग आहे. महाराष्ट्रातील मोठया औदयोगिक महामंडळापैकी एक गाजले जाणारे म्हणजे तारापुर औदयोगिक वसाहत पालघर मध्ये आहे.

मासेमारीसाठी मोठया बंदरांमध्ये गाजले जाणारे सातपाटी बंदर ही पालघर मध्येच आहे. दातिवारे हे देखील बंदर आहे. डहाणूबरोबर चिकू उत्पादनात देखील पालघर तालुका प्रसिद्धा आहे.