भारत निर्माण कार्यक्रमातील नॅशनल गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सर्व पंचायत राज संस्थाचे संगणकीकरण करुन त्यांच्या कारभारात एक सुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ईपीआरआय/ईपंचायत हा मिशन मोड प्रकल्प हाती घेणेत आलेला आहे.
महाराष्ट्रातील सर्व पंचायत राज संस्थांचे जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायत (संगणकीकरण करुन त्यांचा कारभार ऑनलाईन करण्याचा महत्वकांक्षी संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) ई-ग्राम सॉफ्ट हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
प्रकल्प अंमलबजावणी करीता CSC-SPV या कंपनीची नेमणुक करणेत आलेली आहे.
महाराष्ट्रात हा प्रकल्प आपले सरकार सेवा केंद्र या नावाने राबविण्यात येत आहे.